शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय क्षेत्रातील नेत्यांसह सामान्यांच्या देखील यावर प्रतिक्रिया येत आहेत. खासदार सुप्रिया सुळे या सकाळी मार्निंग वॅाकसाठी निघाल्या असत्या त्यांना संदेश पवार हा सफाई कामगार भेटला. पवारांनी अध्यक्षपद सोडू नये, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. या संदर्भात फेसबुक लाईव्ह करत सुप्रिया सुळेंनी माहिती दिली आहे.