खासदार संजय राऊत हे आज बेळगाव दौऱ्यावर आहेत. आपण सीमा भागात प्रचाराला जात आहेत. हा आपला नियोजित दौरा आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रचाराला शिवसेना परंपरेने जात असते, अशी भूमिका त्यांनी मांडली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी देखील बेळगावात यावं, असं आवाहन केलं आहे.