राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा शरद पवार यांनी दिल्यानंतर नवा अध्यक्ष म्हणून खासदार सुप्रिया सुळे यांचं नाव चर्चेत आहे. यावर भाजपा नेते व राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी अमरावतीत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीमध्ये घराणेशाही आहे त्यामुळे ते एका कुटुंबाशिवाय दुसऱ्याचा विचार करू शकत नाही, अशी घणाघाती टीका त्यांनी केली आहे.