जळगाव जिल्ह्यात अनेक महिन्यांपासून अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. गेल्या आठवडाभर अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वारा सुरूच आहे. मोठ्या प्रमाणात भुसावळ तालुक्याला अवकाळीचा फटका बसला आहे. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही आणि पंचनामेही झाले नाहीत, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी थेट भुसावळ तालुका कृषी कार्यालय गाठलं आणि अधिकाऱ्याच्या टेबलावर नोटा आणि सडलेले कांदे फेकत संताप व्यक्त केला.