येत्या ६ मे रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आहेत. बारसू येथील ग्रामस्थांशी ते संवाद साधणार आहेत. मात्र, त्याआधीच भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणेंनी त्यांना इशारा दिला आहे. ६ तारखेला रिफायनरीच्या समर्थनात महायुती मोर्चा काढणार असल्याचं निलेश राणेंनी म्हटलं आहे. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी कोकणात येऊन दाखवावं, असा इशारा या आधी केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी दिला होता. त्यामुळे ठाकरेंचा दौरा आणि महायुतीच्या मोर्चामुळे कोकणातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह आहेत.