भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष भाजपचे नेते खासदार ब्रिजभुषण शरण सिंह यांच्यावर महिला खेळाडूंनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. या विरोधात मागील १२ दिवसांपासून खेळाडू जंतर मंतरवर आंदोलनाला बसले आहेत. त्याच दरम्यान बुधवारी रात्री खेळाडू आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याची घटना घडली आली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील काँग्रेस पक्षाचे नेते संजय बालगुडे यांनी मुलांची प्रतिकात्मक कुस्ती लावून ब्रिजभुषण सिंह यांचा निषेध नोंदविला. तर आंदोलनकर्त्यां महिला खेळाडूंना पाठिंबा देखील दर्शविला आहे.