शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा यासाठी वाय. बी. चव्हाण सेंटर बाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आजही आंदोलन केलं. यावेळी स्वतः सुप्रिया सुळेंनी बाहेर येत कार्यकर्त्यांची समजूत काढली. मात्र पवारांनी निर्णय मागे घ्यावा या मागणीवर कार्यकर्ते ठाम असल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, मंगळवारपासून मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी कार्यकर्ते आंदोलन करत आहेत.