भविष्यात महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण असेल हे आधी जाहीर करा, मग आघाडीच्या गप्पा मारा, असा टोला शिवसेना (शिंदे गट) प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी लगावला आहे. केवळ खुर्चीसाठी हे एकत्र आले आहेत, अशी टीका त्यांनी केली. यावेळी सामनाच्या
अग्रलेखाचा दाखला त्यांनी दिला. राष्ट्रवादीला जर आत्मसन्मान असेल तर अजित पवारांनी अग्रलेखावर प्रतिक्रिया द्यावी, असंही ते म्हणाले.