राज्यासह देशातील राजकारणात शरद पवार यांच्या अध्यक्षपदाच्या निवृत्तीवरून जोरदार चर्चा सुरू आहे. शरद पवार अध्यक्षपदावरून निवृत्त होणार की नाही या निर्णयाकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे. यावर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांच्या भावनांचा देखील विचार केला पाहिजे, असं सूचक विधान त्यांनी केलं आहे. पिंपरी- चिंचवडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.