मणिपूरमध्ये सध्या हिंसाचार उफाळून आला आहे. राज्यातील मैतेई समुदायाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याच्या मुद्द्यावर हा वाद भडकला आहे. यावर बॉक्सर मेरी कॅामने चिंता व्यक्त केली असून हा हिंसाचार थांबवण्याची विनंती राज्य आणि केंद्र सरकारला केली आहे. दरम्यान, राज्यातील आदिवासी समाजाने मैतेई समुदायाला आपल्या प्रवर्गात समाविष्ट करून घेण्यास विरोध दर्शवला आहे. यासाठी अनेक मोर्चे काढण्यात आले. यावेळी झालेल्या वादातून हा हिसांचार उफाळून आला आहे.