पुष्टिपती विनायक जयंतीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात शहाळे महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी बाप्पासमोर ११ हजार शहाळ्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. तर उद्या ६ मे रोजी ससून रुग्णालयातील रुग्णांना शहाळ्यांचा हा प्रसाद देण्यात येणार आहे.