Sharad Pawar Resignation: शरद पवार यांच्या राजीनाम्याचा प्रस्ताव राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीने एकमताने नामंजूर केला आहे. आज ५ मे मुंबईत राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात या समितीची बैठक झाली. यात शरद पवारांचा राजीनामा एकमताने फेटाळण्यात आला आहे. बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेत याची माहिती दिली. दरम्यान, शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोनल पुकारलं होतं.