‘द केरला स्टोरी’ या चित्रपटावरून सध्या वादंग निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील तरुणींच्या धर्मांतरावर चित्रपटातून भाष्य करण्यात आलं आहे. त्यामुळे विविध स्तरातून यावर प्रतिक्रिया येत आहेत. कर्नाटक दौऱ्यावर असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या चित्रपटावर भाष्य केलं आहे. राज्यातील दहशतवादी कटाचा खुलासा चित्रपटातून करण्यात आला आहे, असं विधान मोदींनी केलं. यावेळी त्यांनी काँग्रेसवरही जोरदार निशाणा साधला.