शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क काढले जात होते. या दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी आणि भाजपाचा प्लॅन बी सुरू आहे, असा आरोप केला होता. त्यावर शरद पवारांनी पत्रकार परिषदेत उत्तर दिलं आहे. काही लोकांची मतं पक्की असतात. आणि त्यांचं मत आमच्या प्रतिकूल असतं, असं म्हणत शरद पवारांनी टोला लगावला आहे.