राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत आपला निवृत्तीचा निर्णय मागे घेतला. यावेळी राष्ट्रवादीच्या सर्व प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. मात्र विरोधी पक्षनेते अजित पवार यावेळी गैरहजर होते. त्यामुळे पुन्हा एकदा अजित पवारांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावर आता स्वतः शरद पवारांनी उत्तर दिलं आहे.