शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यपदी कायम राहणार आहेत. निवड समितीने शरद पवारांचा राजीनामा फेटळला होता. त्यानंतर सर्व नेत्यांची सिल्व्हर ओकवर शरद पवारांसह राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांसह बैठक पार पडली. त्यानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत अध्यक्षपदी कायम राहण्याची घोषणा केली. दरम्यान, शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली
होती. राज्यातील कार्यकर्त्यांनी आंदोलनही पुकारत राजीनामा मागे घेण्याची मागणी लावून धरली होती.