दोन महिन्यांपूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि त्याच्या पत्नीने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील अलीझंझा जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट दिली होती. येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना गणवेश, पुस्तकं आणि दप्तर देण्याचं अभिवचन दिलं होतं. त्यानंतर दोन महिन्यानंतर सचिन आणि त्याच्या पत्नी आवर्जून या शाळेला भेट देत आपलं वचन पूर्ण केलं आहे. आपल्या आवडत्या क्रिकेटपटूकडून ही भेट स्वीकारताना शाळेचे विद्यार्थी देखील गहिवरले. हा भावनिक प्रसंग ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील अलीझंझा शाळेत उपस्थित असलेल्या सर्वांनी याची देही याची डोळा अनुभवला.