जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचे देहू परिसरातील भंडारा डोंगर येथे भव्यदिव्य असं मंदिर बांधण्यात येत आहे. तुकोबांच्या आणि अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या श्रीरामाच्या मंदिरात अनेक साम्य आहेत. सात एकर परिसरातील २५ गुंठ्यांत तुकोबांचं भव्यदिव्य मंदिर बांधण्यात येत आहे. मंदिराचं बांधकाम दगडात होणार असून ते २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचा मानस आहे, अशी माहिती भंडारा डोंगर चे ट्रस्टी बाळासाहेब काशीद यांनी दिली आहे.