निजामकालीन वस्ती असलेल्या महाराष्ट्र-तेलंगाना सीमेवरील जिवती तालुक्यातील ‘घोडनकप्पी’ ग्रामस्थांची मन की बात पंतप्रधान नरेंद्र मोदी ऐकतील काय? असा प्रश्न आदिवासींना पडला आहे. गावात जायला रस्ता नाही. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. दळणवळणाची साधनं नाहीत. अशावेळी आम्हाला आमच्या मुलभूत सुविधा, हक्क द्या, असा टाहो आदिम कोलाम व राजगोंड समुदाय असलेले गावकरी फोडताहेत.