बारसूतील प्रस्तावित रिफायनरीवरून मोठा वाद सुरू आहे. या प्रकल्पाला ग्रामस्थांनी विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज बारसूत दाखल झाले. यावेळी त्यांनी सोलगावातील ग्रामस्थांशी संवाद साधला. रिफारनरीच्या विरोधात ग्रामस्थांची घोषणाबाजी यावेळी सुरुच होती.