माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज बारसू दौऱ्यावर होते. प्रस्तावित रिफायनरीला ग्रामस्थांकडून विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात होता. यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी टीका केली आहे. ठाकरेंच्या दौऱ्यात ग्रामस्थांसह इतर बाहेरच्या लोकांचाही सहभाग होता. असं म्हणत या संदर्भातील अहवालही उदय सामंत यांनी वाचून दाखवला आहे.