मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक होणार असल्याची चिन्हे आहेत. मराठा आरक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष सुभाष जावळे पाटील यांनी तसा इशाराच दिला आहे. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण न केल्यास जिल्ह्या- जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या निवसासमोर जागरण गोंधळ घालणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तसेच, १ जूनला मुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. आज आकुर्डी येथे मराठा आरक्षण एल्गार परिषद पार पडली. यावेळी सुधाकर माने, धनाजी येळकर यांच्यासह विविध जिल्ह्यातील समन्वयक उपस्थित होते.