राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या राजीनामा प्रकरणावर सविस्तर भाष्य केले. ‘हे खरं आहे की राजीनामाच्या निर्णयामुळे पक्षातील नेते, हितचिंतक अस्वस्थ होते. त्या सर्वांचा आग्रह असल्याने माझा निर्णय मला बदलावा लागला, पण मी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला म्हणजे पक्ष संघटनेचे काम सोडलं असा गैरसमज होता. तोच गैरसमज आज दूर होत आहे याचा आनंद आहे’ असे स्पष्टीकरण पवार यांनी दिले.