राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर सामना अग्रलेखातून पुन्हा एकदा भाजपासोबत जाण्यास इच्छूक असलेल्यांना निशाणा करण्यात आलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ म्हणाले की, ‘शरद पवार त्यांच्या पुस्तकात जे म्हणाले होते त्यावर उद्धव ठाकरेंनी आधीच स्पष्टीकरण दिलं आहे. “मला महाविकास आघाडीत बिघाडी करायची नाही” असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. संजय राऊतांना हे सगळं उकरून काढायची काय गरज आहे? त्यांना काय अडचण आहे ? त्यांना असं वाटत का, की राष्ट्रवादीने महाविकास आघाडीतून बाहेर पडायला पाहिजे?’ असा थेट सवाल भुजबळांनी केला आहे. याचसोबत “तुमचं जेवढ आयुष्य आहे, तेवढं शरद पवारांच राजकारण आहे” अशी टीकाही छगन भुजबळ यांनी केली.