नांदेडमधील पाच वर्षांची शर्वरी हमंद ही भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांची चाहती आहे. त्यांना एकदा भेटता यावं यासाठी तिने आई वडिलांकडे हट्ट धरला होता. अखेर परळीत जाऊन तिने पंकजा मुंडेंची भेट घेतली. यावेळी तिने गायलेल्या गाण्याचं पंकजा मुंडेंनी कौतुकही केलं.