Narhari Zirwal: विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सत्तासंघर्षावर भाष्य करताना महत्त्वाचं विधान केलं आहे. सत्ता संघर्षात सरकार गेल्यावर काय करणार, असा अनेकदा प्रश्न विचारला जातो. त्यावर नरहरी झिरवळ यांनी मला मुख्यमंत्री करा, असं भन्नाट उत्तर पत्रकारांना दिलं. यावेळी त्यांनी अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदावरून केलेल्या विधानाचा दाखला देखील दिला.