CM Shinde in Karnataka: कर्नाटक विधानसभेच्या जागांसाठी १० मे रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील प्रचारात उतरले आहेत. कर्नाटकातील कापू येथील प्रचार सभेसाठी ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्र-कर्नाटक यांचे नाते सांगत शिवकाळाचाही संदर्भ दिला. त्याचबरोबर ‘आम्ही मैत्री इमानदारीत निभावतो’ असा टोलाही ते विरोधकांना मारायला विसरले नाहीत.