Manipur Violence: मणिपूरमध्ये निर्माण झालेल्या दंगलीच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील २५ विद्यार्थी अडकले होते. या २५ विद्यार्थ्यांना इंफाळहून गुवाहाटीमार्गे मुंबईत आणण्यात यश आलं आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात सुखरूप आणता यावं यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने मणिपूरचे मुख्यमंत्री एन.बिरेन सिंह यांच्याशी संपर्क साधला होता. त्याचप्रमाणे आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्याशीही चर्चा केली होती.