संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा ११ जून ला पंढरपूकडे प्रस्थान ठेवणार आहे. यावर्षी माऊलींचा रथ ओढण्याचा मान आळंदीमधील भोसले कुटुंबाच्या सर्जा- राजा बैलजोडीला मिळाला आहे. २००१, २०११ आणि आता ११ जून २०२३ मध्ये तिसऱ्यांदा मान मिळाला आहे. रथ ओढण्यासाठी भोसले कुटुंबाने कर्नाटकमधून खिलार जातीची बैलजोडी विकत घेतली आहे. अशी माहिती संतोष तुळशीराम भोसले यांनी दिली.