पुण्यातील मावळमध्ये पवना धरणग्रस्तांकडून मोर्चा काढण्यात आला. गेल्या कित्येक वर्षांपासून धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासह अनेक मागण्या प्रलंबित आहेत. पवनानगर बाजारापेठेतून हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चेकरांना अडवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला तेव्हा मावळचे आमदार सुनील शेळके यांनी आम्हाला अडवण्याचा प्रयत्न करू नका. गोळ्या घाला पण शेतकऱ्यांची अडवणूक करू नका, अस म्हणत त्यांनी मोर्चा पवना डॅमच्या गेटमधून आत नेला.