उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी ९ मे मंगळवारी रात्री नागपूरमधील चित्रपटगृहात ‘द केरला स्टोरी’ पाहिला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत चित्रपटाविषयी आपली प्रतिक्रिया दिली. चित्रपट गोष्ट सांगण्यासाठी नसून जागृत करण्याकरिता आहे. यावेळी त्यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विधानाचा देखील समाचार घेतला. चित्रपट निर्मात्याला फासावर लटकावलं पाहिजे, असं विधान जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं.