‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट पाच मे रोजी प्रदर्शित झाला असून या चित्रपटावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. या चित्रपटावरून अनेक वाद होत आहेत. यावर राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत टीका केली. याला उत्तर देताना भाजपा नेते किरीट सोमय्या म्हणाले की, “मी, मौलाना जितेंद्र आव्हाड यांना चैलेंज करतो की हिंम्मत असेल तर ‘द केरला स्टोरी’ बंद करून दाखवा. उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी देखील हा चित्रपट बंद करून दाखवावा. आव्हाड यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी निर्मात्याला हात लावून दाखवावा”