राज्यातील सत्तासंघर्षावर आज (१० मे) सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. त्यामुळे राज्यासह देशाचं लक्ष या निकालाकडे लागणार आहे. निकाल आपल्या बाजूने लागेल असा दावा शिवसेनेच्या (शिंदे गट) आमदारांकडून केला जात आहे. असं असतानाच आता ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी उदय सामंत हे उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा केला आहे.