Sanjay Raut On Maharashtra Politics: सर्वोच्च न्यायालयाकडून दिल्या जाणाऱ्या निकालाची जोरदार चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर निकाल कुणाच्या बाजूने लागणार? यावर तर्क-वितर्क आणि दावे-प्रतिदावे केले जात आहेत. यावर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, ‘आजचा निकाल देशात लोकशाही आहे की नाही हे ठरवेल’ त्याचबरोबर ‘आम्हाला न्यायची अपेक्षा आहे’ असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.