राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीने नोटीस बजावली आहे. आयएल आणि एफएस या प्रकरणात जयंत पाटील यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. एकीकडे सत्तासंघर्षाचा निकाल तर दुसरीकडे ईडीच्या या नोटीशीमुळे एकच चर्चा रंगली आहे.
या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी माध्यमांसमोर भूमिका स्पष्ट केली आहे.