सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील निकाल सुनावला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी राज्यपाल यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. देशात राज्यपाल ही यंत्रणा अस्तित्वात ठेवायची की नाही, हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाकडे न्यायला पाहिजे, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.