महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होते. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला असून प्रतोद नियुक्तीवरून शिंदे गटाला जोरदार झटका दिला आहे. तसंच तत्कालीन राज्यपालांच्या भूमिकेवर देखील न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. या सर्व घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार हे पुणे विमानतळावर आले होते. याबाबत अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची प्रत जोपर्यंत वाचण्यास मिळत नाही. तोपर्यंत मी बोलणार नाही.