Uddhav Thackeray On SC: सर्वोच्च न्यायालयाने सत्तासंघर्षावरील निकाल देताना उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर सरकार परत येण्याची शक्यता होती, असं निरीक्षण नोंदवलं होतं. त्यावर आज उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. मी माझ्या निर्णयावर समाधानी आहे, असं ठाकरेंनी म्हटलं. तसंच हे सरकार बेकायदेशीर आहे, अशी टीकाही त्यांनी केली.