सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने शिंदे सरकारला दिलासा मिळाला असला तरी, १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवण्यात आला आहे. यावरून आता अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. या पार्श्वभूमीर ठाकरे गटाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी अनिल परब यांनी न्यायालया्च्या निकालातील मुद्दे अधोरेखित केले. तसंच निकालाची प्रत घेऊन अध्यक्षांना पत्र देणार असल्याचं अनिल परब यांनी यावेळी नमूद केलं.