शिंदे-फडणवीस सरकार बेकायदेशीर आहे. पोलिसांनी त्यांचे आदेश पाळू नये. त्यांचे बेकायदा आदेश पाळाल तर अडचणीत याल, असा इशार खासदार संजय राऊतांनी दिला आहे. नाशिकमध्ये त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान, सत्तासंघर्षाच्या निकालानंतर अनेक मुद्दे चर्चेत आले आहेत. १६ आमदारांच्या अपात्रेता मुद्दा विधानसभा अध्यक्षांकडे आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून आता ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.