सुप्रिम कोर्टाच्या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. निकाल गोंधळात टाकणारा असल्याचं म्हणत त्यांनी काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. दरम्यान, न्यायालयाच्या निकालावरून ठाकरे गट आणि सत्ताधाऱ्यांकडून अनेक दावे केले जात आहेत. तसंच १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा अद्याप निकाली निघालेला नाही. त्यावर ठाकरे गटही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.