कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी १० मे रोजी मतदान पार पडलं. भाजपा, काँग्रेस, जनता दल ( धर्मनिपेक्षक ) यांच्यात प्रमूख लढत झाली. शुक्रवार ( १३ मे ) मतमोजणी सुरु आहे. या मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर दिसत आहे. तर, भाजपा आणि जनता दलाला अपेक्षित अशी आघाडी मिळत नसल्याचं दिसत आहे. यानंतर ‘भाजपाला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी आम्ही काहीही करू. कर्नाटकाच्या हितासाठी माझ्या वडिलांना मुख्यमंत्री करायला हवं’ असा दावा काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्यांचा मुलगा यथिंद्र सिद्धारमय्या यांनी केला आहे.