गांधी परिवाराला बेघर करण्याची शिक्षा कर्नाटकाच्या जनतेने भाजपला दिली असल्याचे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर टीका केली. देशातली लोकशाही संपवण्याचे काम भाजप करत आहे. त्यामुळे हे बदलाचे वारे असून राहुल गांधींचे नेतृत्वावर शिक्कमोर्तब करण्याचं काम कर्नाटक मधून सुरु झाल्याचे पटोले यांनी म्हटले आहे. पटोले हे जालनामार्गे विदर्भात जात असताना ते जालना येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.