जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्याप्रकरणाला आता वेगळं वळण मिळालं असून राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्यासह एकूण सात जनांवर हत्येच्या कटात सहभागी झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले आहे. ‘किशोर आवारे यांच्यासोबत राजकारणामध्ये एकत्रितपणे काम केलं. आमचे विचाराच्या माध्यमातून मतभेद असतील पण मनभेद नव्हते. परंतु, काही मंडळी यामध्ये जाणीवपूर्वक राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अस कोणी करत असेल तर ते कोणी करू नये. या घटनेला राजकीय वळण देऊ नका असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. पोलिस यंत्रणेला मी पूर्ण सहकार्य करत आहे’ अशी प्रतिक्रिया दिली .