कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा विजय झाल्यानंतर काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार भावूक झालेले पाहायला मिळाले प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, “काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेत्यांनी खूप मेहनत घेतली. जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला, नेत्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. हे सामूहिक नेतृत्वाचं फळ आहे. मी सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जून खरगे यांना विश्वास देतो की, आम्ही कर्नाटकच्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू. मी हे कधीही विसरू शकत नाही की, या भाजपाच्या लोकांनी मला तुरुंगात टाकलं तेव्हा सोनिया गांधी मला भेटायला तुरुंगात आल्या. मी तुरुंगात राहणं पसंत केलं. हा गांधी कुटुंबाने, काँग्रेस पक्षाने आणि देशाने माझ्यावर टाकलेला विश्वास आहे”