कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला १६५ जागांसह स्पष्ट बहुमत मिळालं तर भाजपाला ६६ जागांसह दारुण पराभव स्वीकारावा लागला. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाजपाला टोला लगावल्यानंतर आशिष शेलार यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं. तर हा वाद इथचे थांबला नसून राज ठाकरेंनी पुन्हा यावर भाष्य करत आशिष शेलारांना सुनावलं आहे. “ज्यांची पोहच नसते, त्यांना या गोष्टी सुचू शकतात. ही कोण लोक आहेत मुळात… निवडणुका असल्यावर नाक्यावर सभा घेणारी ही लोक आहेत”, अशी टीका राज ठाकरेंनी केली. कल्याणमध्ये ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.