सुप्रीम कोर्टाने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आता यावर निकाल देतील. ठाकरे गटाकडून निकाल लवकर लागावा अशी मागणी केली जात आहे. तसंच हा निकाल आपल्या बाजूने लागेल, असा विश्वास ठाकरे गटाला आहे. असं असतानाचा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वेगळं मत व्यक्त केलं आहे.