आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकत्र होण्याची चर्चा आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांसमोर स्पष्टीकरण दिलं. तसंच लोकसभेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन या पुन्हा एकदा बारामती दौऱ्यावर येणार आहेत. याबद्दल प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीसांनी पत्रकारांनाच टोमणा मारला. पुण्यात ते बोलत होते