१६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सध्या बराच चर्चेत आहेत. योग्य निकषांनुसारच निर्णय दिला जाईल असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं. तर भरत गोगावलेंची पुन्हा प्रतोदपदी नियुक्ती करण्याबाबतही त्यांनी सूचक विधान केलं होतं. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया देत नार्वेकरांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे.