महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वरमधील कथित घटनेची चर्चा सध्या होताना पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात हिंदुत्वाच्या नावाने टोळ्या निर्माण करायच्या आणि वातावरण बिघडवायचा कट दिसतोय, असं म्हणत राऊतांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. तसंच मंदिरात कोणीही घुलसं नाही, अशी माझ्याकडे माहिती असल्याचंही संजय राऊत म्हणाले. आज नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.